Homeताज्या बातम्या

तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन; अकोलेत किसान सभेची जोरदार निदर्शने

अकोले : कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान द्यावे आणि हा

डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान’ पुरस्कार; अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते गौरव
शाळेतील मैत्रीने उभी केली सामाजिक मदतीची भक्कम भिंत‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’च्या वतीने 30 हजार रुपयांची मदत
सह्याद्री उजळला काजव्यांच्या मायावी प्रकाशाने! अकोलेतील ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची झुंबड; निसर्गाचा अद्भुत सोहळा

अकोले : कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान द्यावे आणि हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक, मजुरी आणि शेती खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. केंद्र सरकारकडून वेळोवेळी लादण्यात येणारी निर्यात बंदी, अपुरी साठवणूक व्यवस्था आणि बाजार हस्तक्षेपाचा अभाव यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यामध्ये सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. तसेच केरळचे नेते पिणरई विजयन यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही यावेळी धिक्कार करण्यात आला. कांद्याच्या प्रश्नावर सरकारने दीर्घकालीन धोरण आखून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

COMMENTS