Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नाडाकडून यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्माला नोटीस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दोन प्रमुख खेळाडूंना उत्तेजक द्रव्यविरोधी चाचणी प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरो

विश्वचषकात इंग्लंडची विजयी सलामी; घानाचाही थरारक विजय
फुटबॉल विश्वचषक स्पर्धा: अमेरिकेचा पराग्वेवर ४-१ असा दणदणीत विजय; फॉलारिन बालोगुनची दुहेरी गोलधडक
मेस्सीचा ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर ३-० विजय
Dope Test: यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा गोत्यात, NADA ने पाठवली नोटीस;  बीसीसीआयकडे तक्रार - Marathi News | Yashasvi Jaiswal and Shafali Verma in  trouble after failing dope test NADA sends ...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दोन प्रमुख खेळाडूंना उत्तेजक द्रव्यविरोधी चाचणी प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेकडून (NADA) नोटीस बजावण्यात आली आहे. भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांच्याविरोधात “निर्धारित ठिकाणी अनुपस्थित” अशी प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

संस्थेच्या नियमानुसार, खेळाडूंनी पूर्वनियोजित वेळ व ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक असते. त्या ठिकाणी चाचणी अधिकारी पोहोचल्यानंतर खेळाडू उपस्थित न आढळल्यास त्याची नोंद केली जाते. याच कारणावरून जयस्वाल आणि शेफाली यांना स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांनुसार, बारा महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारच्या तीन नोंदी झाल्यास संबंधित खेळाडूवर नियमभंगाची कारवाई होऊ शकते. सुनावणीनंतर दोष सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत बंदीची तरतूद आहे. मात्र, सध्या या दोन्ही खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जयस्वालच्या नमुना चाचणीसाठी अधिकारी डिसेंबर महिन्यात, तर शेफालीच्या चाचणीसाठी नोव्हेंबरमध्ये गेले होते. मात्र, दोघेही त्या वेळी संबंधित ठिकाणी आढळले नाहीत. त्यानंतर संस्थेकडून फेब्रुवारी महिन्यात प्रतिसाद मागवण्यात आला होता. वेळेत उत्तर न मिळाल्याने पहिली चुकलेली चाचणी नोंदवण्यात आली. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुढील काळात अशा आणखी नोंदी झाल्यास संबंधित खेळाडूंना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

COMMENTS