Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक; उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना

बीड : उन्हाळ्याच्या काळात नागरिकांसमोर पाणीटंचाई सारखे संकट उभे राहू नये. त्या संदर्भात नियोजन करून तातडीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करा

पदाचा दुरुपयोग केल्यास पद काढले जाईल; उपनेत्या खा.ज्योती वाघमारे; कोपरगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
वाडी (बु.) उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड उत्तरमधील सर्व विकासकामांना गती द्या;नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या आ.कल्याणकर यांच्या अधिकार्‍यांना सूचना
खा. अशोकराव चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत घेतली आढावा बैठक

बीड : उन्हाळ्याच्या काळात नागरिकांसमोर पाणीटंचाई सारखे संकट उभे राहू नये. त्या संदर्भात नियोजन करून तातडीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात अशा सुचना आ.संदिप क्षीरसागर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या आणि पीक विम्याच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकार्यांना सुचना दिल्या आहेत.
सोमवार (दि.4) रोजी पाणी टंचाई आणि शेतकर्यांच्या विविध समस्या यांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृह बीड येथे पंचायत समिती, कृषी विभाग आणि इतर विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बीड मतदारसंघातील बीड व शिरूर (का.) तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई सारखी भीषण समस्या निर्माण होऊ नये यासाठी टँकरने पाणी पुरवठा, जलस्त्रोत अधिग्रहण आणि इतर उपाययोजना करण्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाईला होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर नियोजन करून उपाय योजनांची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशा सुचना आ.क्षीरसागर यांनी दिल्या. तसेच, पीक विमा, पी.एम.किसान योजना तसेच शेतकर्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणार्या विविध योजना आणि शेतकङयांच्या दृष्टीने त्यामध्ये असलेल्या अडचणी या बाबत देखील यावेळी आ.क्षीरसागर यांनी कृषी विभागाच्या अधिकाङयांकडून आढावा घेवून आवश्यक त्या सुचना केल्या. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, बीड पंचायत समिती,  शिरूर (का.) पंचायत समिती, कृषी विभाग येथील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.
आवश्यक असलेल्या गावांमध्ये टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर करा- आ.संदिप क्षीरसागर
बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर का. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यातील होणाङया पाणी टंचाई साठी आवश्यक असलेल्या गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेवून टँकर मागणीचे प्रस्ताव आपल्या पंचायत समितीकडे सादर करावेत, असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे.

COMMENTS