Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निखिल कन्स्ट्रक्शनचा भोंगळ कारभार; राष्ट्रीय महामार्ग 161(अ) बनला मृत्यूचा सापळा! 121 कोटी खर्चूनही काम अपूर्ण; खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यातसार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

भोकर : भोकर-बारसगाव ते भोकर-रहाटी (तेलंगणा सीमेपर्यंत) या राष्ट्रीय महामार्ग 261 (सुधारित 161 अ) च्या कामात निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मोठ्या प

माजलगावात विकासाच्या नावाखाली उघड ‘डाका’;सुवर्ण जयंती योजना की भ्रष्टाचाराचा बाजार? : नवीदोद्दीन सिद्दिकी
जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!

भोकर : भोकर-बारसगाव ते भोकर-रहाटी (तेलंगणा सीमेपर्यंत) या राष्ट्रीय महामार्ग 261 (सुधारित 161 अ) च्या कामात निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मोठ्या प्रमाणात दिरंगाई व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. कामाची मुदत संपून वर्ष उलटले तरी महामार्ग अद्याप अर्धवट अवस्थेत असून, या निष्काळजीपणामुळे शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.सुमारे 56 किमी लांबीच्या या महामार्गासाठी शासनाने 121 कोटींहून अधिक निधी मंजूर केला होता. चार-पाच वर्षांपूर्वी सुरू झालेले काम नियमानुसार दोन वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, मुदत संपूनही काम अपूर्णच आहे. एवढा मोठा निधी खर्च होऊनही रस्ता पूर्ण न झाल्याने निधीचा वापर नेमका कुठे झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्गावरील कामातील दर्जाहीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर केवळ एक-दोन वर्षांतच सळाखे उघडे पडले असून, संरचना चाळणीसारखी झाली आहे. सीसी रस्त्यावर मोठ्या भेगा व तडे गेले आहेत. मातूळ पुलाजवळ रस्ता व पुलाच्या सांध्यामध्ये धोकादायक अंतर निर्माण झाले आहे. तेलंगणा सीमेजवळ सुरू असलेले कामही निकृष्ट दर्जाचे असल्याने वाहनचालकांना अंदाज न येता अपघात घडत आहेत. डोंगरे टी-पॉईंट ते बारसगावपर्यंतच्या देखभालीची जबाबदारी निखिल कन्स्ट्रक्शनकडे असूनही, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. भोकर-बारसगाव मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. तसेच आमदरी गावाजवळील टोल नाक्याचे कामही अर्धवट असून, तेथील साहित्य आधीच मोडकळीस आले आहे. नागापूर, पोमनाळा, सावरगाव, पिंपळगाव, मातूळ, नांदा या मार्गांदरम्यान झालेल्या अपघातांत अनेक तरुणांनी प्राण गमावले आहेत. या मृत्यूंना जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या प्रमुख मागण्या निखिल कन्स्ट्रक्शनचा ठेका तात्काळ रद्द करावा कंपनीला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे विलंब व निकृष्ट कामाबद्दल मोठा दंड ठोठवावा सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करावी  या महामार्गावर प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS