Homeताज्या बातम्याबीड

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; मातांचा पैठणी देऊन गौरव – बीडमध्ये अनोखा उपक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट, बीड यांच्या वतीने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग

कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचा दहावीचा निकाल 80.83 टक्के
जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी व बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
कौशल्याधारित शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्य : आ. लहामटे  



महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट, बीड यांच्या वतीने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात आला, तर त्या विद्यार्थ्यांच्या मातांचा पैठणी देऊन गौरव करत ‘मातृशक्ती’ला सलाम करण्यात आला.
ट्रस्टचे सचिव मा. सुभाषचंद्र सारडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, बीड येथे इयत्ता सातवीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. भूमी अनंत मोटे तसेच राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, बीड येथील इयत्ता पाचवीतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी चि. अनुराज अंकुश घाडगे (शेतकरी कुटुंबातील) यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श उभा राहिला. राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय, प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय आणि किशोरी इंग्लिश स्कूल, बीड यांच्या संयुक्त प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर आयोजित ‘मातृगौरव सोहळ्यात’ प्रत्येक इयत्तेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मातांचा मानाची पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मुलांच्या यशामागील आईच्या कष्टांचा सन्मान करताना अनेक मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या मुलीच्या हस्ते ध्वजारोहण होताना आणि स्वतःचा सन्मान होताना पाहून भूमी मोटे यांच्या मातेलाही विशेष आनंद झाला. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक पी. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या यशाचा खरा कणा म्हणजे आई. तिच्या कष्टाची दखल घेणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे. समारोप प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती तायडे डी. ओ. यांनी विद्यार्थ्यांनी आईचा नेहमी आदर ठेवावा, असे आवाहन केले. या अभिनव उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. कार्यक्रमास राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती तायडे डी. ओ., राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरवसे पी. डी., प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील ए. आय., किशोरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती मेघा बिर्ला तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS