Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचे सावट

छ. संभाजीनगर ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा मराठवाड्यावर गारपीटीसह अवकाळी पावसाचे सावट आहे. काही द

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
 शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसर कोणतं नाव देता येणार नाही – आ. प्रदिप जैस्वाल 
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ

छ. संभाजीनगर ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा मराठवाड्यावर गारपीटीसह अवकाळी पावसाचे सावट आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीमुळे ऐन उन्हाळ्यात नदीनाले तुडुंब भरून वाहात होते. कायम दुष्काळी बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा पुढचे तीन दिवस मराठवाड्यावर गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. येत्या 3 दिवसात मराठवाड्यामध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान 43 अंशांपर्यंच पोहोचले आहे. उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच, शेतपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आता पुन्हा हवामान विभागाने इशारा दिल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

COMMENTS