Homeताज्या बातम्या

धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा; अहिल्यानगर न्यायालयाचा निर्णय

अहिल्यानगर : कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश (चेक) बँकेत वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावली आहे

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
‘पैशाच्या व्यवहारासाठी अक्कल लागते’; तोतया पत्रकार झोंटिंगकडून पोलिसांच्या नावाने पैशांची मागणी अहिल्यानगर पोलिसांची बदनाम; पोलिसांनी दाखल करावा गुन्हा
श्रीरामपुरातील ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात चेअरमन सुरेश कुटेसह १० संचालकांना अटक; १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
District and Sessions Court, Ahmednagar | India

अहिल्यानगर : कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश (चेक) बँकेत वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

केडगाव येथील कल्पतरू बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेकडून प्रवीण राजू शेंडगे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या थकबाकीपोटी त्यांनी संस्थेला दिलेला धनादेश बँकेत सादर केला असता, खात्यात अपुरा निधी असल्याने तो अनादरित (बाउन्स) होऊन परत आला. यानंतर पतसंस्थेने आरोपीविरुद्ध चलनक्षम लिखत अधिनियमाच्या (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) कलम १३८ अन्वये न्यायालयात दावा दाखल केला होता.

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ६ येथे पार पडली. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि नोंदींचा विचार करून न्यायालयाने आरोपी प्रवीण शेंडगे यास दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस २ लाख १० हजार रुपये दंड आणि एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले असून दंडाची ही रक्कम फिर्यादी पतसंस्थेस नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे.

या प्रकरणात फिर्यादी संस्थेच्या वतीने ॲड. अमोल बनकर व ॲड. आशिष शिंदे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना ॲड. आर. यू. बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. या खटल्यात साक्षीदार अशोक तांबे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

COMMENTS