Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाव उशाला कोरड घशाला, आठ महिन्यापासून जलजीवन ठप्प

आष्टी : सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह राज्यांत पूरपरिस्थिती ने संपूर्ण हाहाकार घातला होता. नदी,नाले,ओढे तुडुंब भरून वाहत होते. नदीच्या द

महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!
कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात
डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 

आष्टी : सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह राज्यांत पूरपरिस्थिती ने संपूर्ण हाहाकार घातला होता. नदी,नाले,ओढे तुडुंब भरून वाहत होते. नदीच्या दुतर्फा असणारी शेतीतील माती खरडून वाहून गेली आणि शेजारील विहीरी सुद्धा बुजल्या गेल्या, शेतकर्‍यांवर एकप्रकारे अस्मानी संकटचं कोसळलं होतं नंतर सरकारी घोषणांचा पाऊस झाला प्रत्यक्षात शेतकर्‍यांना अजून सुद्धा त्याचा मावेजा मिळालेला नाही. अशातच आष्टी तालुक्यातील हिवरा येथील जलजीवन ची विहीर उदंरखेल तलावाजवळ नदीच्या शेजारी असल्याने माती, दगड,गोटे,खरीफ याने पूर्ण बुजली आहे तसेच लोखंडी पाईफ, रॅम्प, तीन मोटर विहिरीत बुजून गेल्या आहेत. पूरपरिस्थिती नंतर पाणी पुरवठा अधिकारी यांनी विहिरींची पाहणी केली, सर्व्हे ,पंचनामा,खर्चाचे अंदाजपत्रक काढले गेले पण प्रत्यक्षात आठ महीने झाले अजून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. गावाशेजारीच असणार्‍या दुसर्‍या विहिरीने मार्च मध्येच दम तोडल्याने लोकांना आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. शासन लाखो रुपये खर्च करून जलजीवन योजना राबवत असतांना अधिकारीचं जर वेळकाढूपणा करीत असतील तर सर्वसामान्य लोकांनी करायचं काय.? महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असतांना आतातरी पाणी पुरवठा योजना सुरळीत होईल का.? याची लोकं वाट पहात आहेत.

COMMENTS