वडवणी : महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. 01 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात स

वडवणी : महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. 01 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध शैक्षणिक व गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वीच्या वार्षिक निकालानुसार प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव आंधळे होते. प्रमुख उपस्थितीत प्राचार्या श्रीमती शोभाताई के. आंधळे/डोईफोडे, प्रमोद महाजन इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. शितल लाटणे, उपप्राचार्य मस्के सर, पर्यवेक्षक धाईतिडक सर, अर्थ विभाग प्रमुख डोईफोडे सर, परीक्षा विभाग प्रमुख सुनील कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. ज्ञानेश्वरी कनके सर यांनी सादर केलेल्या तुमची आमची शाळा महाराणी ताराबाई या गीताने झाली. एनएमएमएस 2025-26 परीक्षेत इयत्ता 8 वीतील चि. साई ज्योतीराम टिपरे यांनी 157 गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्यासह कु. वरवडे समृद्धी विठ्ठल, कु. भागवत नारायणी गणेश, कु. रोकडे श्रावणी भारत, चि. टिपरे शुभम सुभाष, चि. राठोड सुरज अंकुश आणि चि. राठोड युवराज अनिल असे एकूण 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांसाठी एकूण 3,36,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्राथमिक गटातून कु. आळणे देहू, कु. खाडे असावरी, चि. कागणे कृष्णा आणि माध्यमिक गटातून चि. डिगुळे सुरज, कु. भालेराव ईश्वरी, चि. चव्हाण सिद्धार्थ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या शोभाताई आंधळे/डोईफोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रियांका कुरकुटे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश घोळवे सर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS