Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता

नेकनूर : वारकरी संप्रदायातील भक्तीसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची शनिवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने उत्साहा

शक्तीशिवाय सत्य अपूर्ण नागपुरात जगातील पहिल्या ‘भारतदुर्गा मंदिराचे मोहन भागवत हस्ते भूमिपूजन
भैरवनाथ नगरातील शिवमहापुराण कथेचा समारोप; काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता
“वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान!” – नागपुरात वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी …

नेकनूर : वारकरी संप्रदायातील भक्तीसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची शनिवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून सुमारे 1 ते 1.5 लाख भाविकांनी उपस्थिती लावून श्रीक्षेत्र नेकनूर परिसर भक्तिमय झाला.
सकाळी समाधी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ह.भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन मांडत सांगितले की, वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसारात संत बंकटस्वामी महाराजांचा सिंहाचा वाटा आहे. अध्यात्मिक जीवनात तत्त्वांशी तडजोड न करता सदाचारी व सद्विचारी समाज घडविणे आवश्यक आहे. या सोहळ्यास अनेक संत-महंत उपस्थित होते. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, अक्षय भैय्या मुंदडा, राजेंद्र मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. य संत बंकटस्वामी संस्थांच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही – जयकुमार गोरे  राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा देत संस्थानच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले. य वारकरी संप्रदायावर आलेले संकट आम्ही अंगावर घेऊ – मनोज जरांगे पाटील वारकरी परंपरेचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. य सर्व पक्ष एकत्र येऊन विकास साधणार – आमदार संदीप क्षीरसागर  राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन संस्थेच्या विकासासाठी काम करू, असे त्यांनी सांगितले. य संस्थांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील – अक्षय भैय्या मुंदडा तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन विभागातून निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांनी दिला. सप्ताहात 110 पोते साखर, 70 क्विंटल डाळ, 47 टाक्या तेल, 1000 पोते मुरमुरे वापरून महाप्रसाद तयार सुमारे 1 ते 1.5 लाख भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला 1000 महिलांनी महापंगतीत सेवा बजावली तरुण मंडळांनी पार्किंग, पाणी, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली काल्याच्या अभंगानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद वाटप करण्यात आले. नेकनूरमधील महिला गट व तरुण मंडळांनी उत्कृष्ट नियोजन करून उत्सव यशस्वी केला.

COMMENTS