Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मुक्रामाबाद येथे ‘नरसिंह जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी

मुक्रामाबाद : येथील ऐतिहासिक व जागृत देवस्थान असलेल्या श्री नरसिंह मंदिरात ‘नरसिंह जयंती’ उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजर

माहूरच्या रेणुकामातेला आम्रफळांची मनमोहक आरास
नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   
कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा

मुक्रामाबाद : येथील ऐतिहासिक व जागृत देवस्थान असलेल्या श्री नरसिंह मंदिरात ‘नरसिंह जयंती’ उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा 9करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे नरसिंह देवाच्या मूर्तीचा अभिषेक व विशेष पूजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता विधीपूर्वक पूजन करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मंदिर परिसर झेंडूच्या फुलांच्या माळा आणि सुंदर रांगोळीने सजविण्यात आला होता. दुपारी 1 ते 4 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अनिल शिवराज मठपती यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मुक्रामाबाद व परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. ‘नरसिंह महाराज की जय’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

COMMENTS