तब्बल 15 वर्षापासून फरार असणारा पकडला ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 15 वर्षापासून फरार असणारा पकडला ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

अहमदनगर/प्रतिनिधी : 1984मध्ये म्हणजे सुमारे 38 वर्षापूर्वी दाखल दरोडयाच्या गुन्ह्यात शिक्षा लागलेल्या व उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपीलामध्

लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत
विठ्ठलराव वाडगे यांना सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्रदान
अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी : 1984मध्ये म्हणजे सुमारे 38 वर्षापूर्वी दाखल दरोडयाच्या गुन्ह्यात शिक्षा लागलेल्या व उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपीलामध्येही ही शिक्षा कायम झालेला, पण मागील 15 वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरेश महादू दुधावडे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे.
पारनेर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 397,34 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्हयात आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपी सुरेश दुधावडे व इतर आरोपी यांना सेशन केस 94/1984 मध्ये सुनावणीअंती पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुध्द आरोपीने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपिल केले होते. या अपिलाच्या सुनावणीत आरोपीची शिक्षा कायम करण्यात आली होती. यानंतर आरोपी सुरेश दुधावडे हा दि.14 ऑक्टोबर 2005 पासून फरार होता.
उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून आरोपीच्या शोधासाठी सूचित करण्यात आले होते. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी दुधावडे हा मजुरीचे कामानिमित्त वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे राहावयास आलेला होता. त्यामुळे त्याच्या मूळ वास्तव्याबाबत कोणालाही काही सांगता येत नव्हते. अनेक प्रयत्न करूनही आरोपी दुधावडे याच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार तसेच जामीनदार यांच्याकडेही चौकशी करुनही माहिती मिळत नव्हती, तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी आरोपी त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले. याच दरम्यान कटके यांना दुधावडे हा नारायणगाव-ठाकरवाडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे जाऊन नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथीराज ताटे व सहायक फौजदार कोकणे, पोलिस कॉन्स्टेबल तांबे यांच्या मदतीने ठाकरवाडी परिसरात शोध घेऊन दुधावडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

COMMENTS