Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा

मुदखेड : मुदखेड येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला

मुक्रामाबाद येथे ‘नरसिंह जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी
माहूरच्या रेणुकामातेला आम्रफळांची मनमोहक आरास
नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   
आज आर्य वैश्य कुलस्वामिनी श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी यांचा 2511 वा  जन्मोत्सव सोहळा*.... *कोटी कोटी प्रणाम*..... *सर्वांना वासवी ...

मुदखेड : मुदखेड येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. दि. 28 एप्रिल रोजी कालेजी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाची सुरुवात माता वासवी देवीच्या मूर्तीची विधीवत पूजा करून झाली. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत आकर्षक देखावे, भजनी मंडळे तसेच रथावर विराजमान वासवी मातेची भव्य मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण शहराची प्रदक्षिणा घालत शोभायात्रा छत्रपती संभाजी नगर (मराठा गल्ली), चौधरी गल्ली, मठ गल्ली, पोलिस स्टेशन परिसर व सुभाष गंज मोंढा मार्गे पार पडली. गवळी समाज सभागृह, मोंढा येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व आर्य वैश्य समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रम शांततेत यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्य वैश्य युथ, मुदखेडचे आयुष रायपत्रेवार, विपुल पिंपरवार, सोहम काचावार, गंगाधर रायपत्रेवार, कृष्णा पिंपरवार, दर्शन मोटरवार, पीयूष पबशेटवार, प्रथमेश मोटारवार, पार्थ पबशेटवार, अथर्व कोत्तावार व शुभम पिंपरवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS