Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. दत्ता विघावे यांना ’वाङ्मय विभूषण वैभव’ राष्ट्रीय पुरस्कार

अहिल्यानगर : भाषा, साहित्य आणि समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता

बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : गगन हाडा
झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटी;काम दर्जेदार व्हावे; नागरिकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
लाड जळगावच्या साळशीद्ध बाबा यात्रेत रंगला कुस्त्यांचा थरार
डॉ. दत्ता विघावे यांचा मृत्यूपश्‍चात देहदानाचा निर्णय – Lokmanthan | लोकमंथन

अहिल्यानगर : भाषा, साहित्य आणि समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता बाबूलाल विघावे यांना ’वाङ्मय कला संगम’ (गुरुग्राम) तर्फे ’वाङ्मय विभूषण वैभव’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये आयोजित ’सृजनाभिनंदनम् 4’ – अलंकरण उत्सव 2026 मध्ये या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सदर सोहळा शनुकताच दिल्लीत पार पडला. मात्र, डॉ. दत्ता विघावे यांची प्रकृती सध्या अस्वस्थ असल्याने ते या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. संस्थेच्या वतीने त्यांना हा सन्मान ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. डॉ. विघावे यांनी साहित्य, क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. राष्ट्र आणि समाजाला मूल्यांची जोड देत सांस्कृतिक समृद्धीसाठी त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. वाङ्मय कला संगमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कुमार सिंघल आणि संरक्षक डॉ. राकेश छोकर यांनी डॉ. विघावे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमासाठी ’रोशनी किरण जन कल्याण समिती’चे श्री पंकज कुमार यांचे सहकार्य लाभले. डॉ. विघावे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS