Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटी;काम दर्जेदार व्हावे; नागरिकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

कोपरगाव : राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा १७ कोटी

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन
 ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चिंचोली विद्यालयातीचे यश 
‘आकाशवाणी @ 90’ निमित्त निबंध स्पर्धा उत्साहात; अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर विचारमंथन

कोपरगाव : राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीचा योग्य विनियोग होऊन रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

आमदार काळे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ९) पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांसमवेत झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची संयुक्त पाहणी केली. यापूर्वीही या रस्त्यासाठी १६.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र पाया भक्कम नसल्याने व मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतुकीमुळे दुरुस्ती करूनही रस्ता टिकू शकला नाही.

या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाहतुकीचा विचार करून हा मार्ग सिमेंट कॉंक्रीट करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. तोपर्यंत नागरिकांना होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी या रस्त्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधीचे अंदाजपत्रक तयार करताना रस्त्याचे काम टिकाऊ व दर्जेदार होईल, याची काळजी घ्यावी, तसेच आवश्यक ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नागरिकांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वर्षराज शिंदे यांनी नागरिकांच्या सूचनांचा आदर करून दर्जेदार काम होईल, अशा पद्धतीने अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार आवश्यक ठिकाणी सी.डी. वर्क व इतर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

पाहणी वेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, संचालक शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, सुनिल शिंदे, सचिन रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS