Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. महायुतीकडून वि

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणे बदलतायत;भाजप-काँग्रेस-शिवसेना ‘ऑन मोड’, राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस
राष्ट्रवादी काँगे्रसमधील सुप्त संघर्ष उघड
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; दिल्लीत घेतली उपराष्ट्रपतींची भेट!

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. महायुतीकडून विविध पक्षांनी आपापले उमेदवार निश्‍चित करत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी ही संधी आपल्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. पक्ष नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी युवकांना राजकारणात सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा वर्गाशी संवाद वाढवून त्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांवर ठामपणे आवाज उठवण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठीही काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे, असा संदेशही त्यांनी दिला. एकूणच, उमेदवारी अर्जाच्या अंतिम टप्प्यात राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

COMMENTS