ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…

परदेशातून आले सात नागरिक, एकाच तपास लागेना!

अकोले/प्रतिनिधी : संपूर्ण देशाला ओमायक्रॉन विषाणूची चिंता लागून आहे. या पार्श्‍वभूमीवर अकोले तालुक्यात परदेशातून सात नागरिक आल्याने अकोलेकरांचे टेन्श

पालकमंत्री घेणार अखेर जिल्ह्यातील कोविडचा आढावा
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच
पदोन्नती आरक्षण रद्दच्या त्या आदेशाला खंडपीठात आव्हान ; पारनेरच्या आंबेडकरांची जनहित याचिका

अकोले/प्रतिनिधी : संपूर्ण देशाला ओमायक्रॉन विषाणूची चिंता लागून आहे. या पार्श्‍वभूमीवर अकोले तालुक्यात परदेशातून सात नागरिक आल्याने अकोलेकरांचे टेन्शन वाढले आहे. प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली असून त्यांना होम क्वॉरटाईन केले आहे. अकोले तालुक्यातील उंचखडक येथे नेदरलँड या देशातून चार नागरिक आले आहे. ओमन (दुबई) या देशातून एक व्यक्ती धामणगाव आवारी येथे आली आहे. झामबिया या देशातून अकोले शहरात एक व्यक्ती आली आहे तर जर्मनी येथून एक व्यक्ती कोतुळ येथे आली आहे. परदेशातून हे नागरिक अकोले तालुक्यात आल्याने आरोग्य विभागाने या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या आहे. अकोले शहरात अगस्ती कारखाना रोड परिसरात झिम्बाब्वे देशातून आलेला व्यक्तीचा मात्र संपर्क होत नाही. अकोल्यात कारखाना रोेड परिसरात त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचे भाऊ व इतर नातेवाईकांकडून त्याची माहिती प्रशासनाला मिळू शकली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा अद्याप प्रशासनाला शोध लागला नाही. अकोले शहरातील कारखाना रोड परिसरात त्याच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याचे समजते. त्याचा भाऊ व त्याच्या इतर नातेवाईकांशी संपर्क साधला असता तो अकोल्यात राहत नसल्याचे सांगण्यात आले आहे, ही व्यक्ती बिहारी आहे. प्रशासनाला या नागरिकाचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, उंचखडक येथे आलेल्या चारही परदेशी व्यक्तींच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कोतुळ व धामणगाव आवारी येथे आलेल्या व्यक्तींच्या शासकीय चाचण्या आज बुधवारी घेण्यात आल्या असून त्यांचा उद्या गुरुवारी अहवाल मिळेल.

त्यांच्या पुन्हा चाचण्या
उंचखडक येथे आलेल्या चार नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहे. तरी देखील त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. काही दिवसानंतर पुन्हा त्यांच्या चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. शेटे व अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. याबाबत आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन तहसीलदार सतीश थिटे यांनी केले आहे.

COMMENTS