https://www.youtube.com/watch?v=73dqrWpa9Lk शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील ग्रामदैवत श्री साळसिद्ध बाबा यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित
शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील ग्रामदैवत श्री साळसिद्ध बाबा यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्त्यांच्या हंगामाने पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. ‘साळसिद्ध बाबा की जय’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात लाल मातीतील हा कुस्त्यांचा थरार रंगला.
यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात स्थानिक मल्लांसह जिल्ह्याभरातून आलेल्या नामांकित पैलवानांनी आपला सहभाग नोंदवला. विशेषतः लहाण गटातील मुलांपासून ते अनुभवी मल्लांपर्यंत अनेकांनी आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे दर्शन घडवले. मैदानात झालेल्या चुरशीच्या लढतींनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

COMMENTS