Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोवंशला राष्ट्रमातेचा घटनात्मक दर्जा द्यासकल हिंदू समाजाची मागणी; राष्ट्रपती,पंतप्रधान,राज्यपाल,व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन

भारतीय संस्कृतीत  गाईला ’गोमाता’ मानून अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान दिले आहे. गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो,अशी श्रद्धा आहे. ती संपन

समन्वय हरवलेल्या सत्ताकेंद्रात महापौरांचा एकतर्फी कारभार ; नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी
विष्णुपुरीत मुबलक जलसाठा; नांदेडवरील पाणीटंचाईचे संकट टळले
शेतकरी वेठीस धरून कृषी सेवा केंद्रचालकांचा बंदनांदेड जिल्ह्यात बेमुदत आंदोलनाला सुरुवात



भारतीय संस्कृतीत  गाईला ’गोमाता’ मानून अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान दिले आहे. गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो,अशी श्रद्धा आहे. ती संपन्नता, सात्त्विकता आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते,गोमातेला राष्ट्रमातेचा घटनात्मक दर्जा मिळावा आणि गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी एकसंध केंद्रीय कायदा तयार करण्यात यावा या प्रमुख उद्देशाने देशभरात व्यापक स्वरूपात ’गो सन्मान आवाहन अभियान’ राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत दि.27 एप्रिल देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती,मुख्यमंत्री व राज्यपाल यांना मुदखेड तहसीलदारामार्फत हजारो गोभक्तांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर करण्यात सादर करण्यात आले. आपल्या सरकारच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच सांस्कृतिक पुनर्जागरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी कलम 370 रद्द करण्यासारखे ऐतिहासिक आणि धाडसी उपक्रम साध्य झाले आहेत. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि सांस्कृतिक जाणिवेचा पाया असलेली अखिल भारतीय गोवंश आता आपल्या घटनात्मक संरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रपतींनी वृंदावनमधील वात्सल्य गावात संतांच्या उपस्थितीत आपण केलेली ’गोपूजा’ संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत ठरली आहे. त्या प्रसंगी आपण गोमातेला ’जीवनदात्री’ म्हणून संबोधले,यातून गोमातेबद्दलचा आपला गाढ आदर आणि करुणा दिसून येते. तेव्हा या ’जीवनदात्री’च्या संरक्षणासाठी आता निर्णायक पावले उचलली जातील,अशी करोडो भारतीयांची इच्छा असून गोवंशा बद्दल घटनात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,विश्व हिंदू परिषदेचे,बजरंग दल, विविध हिंदू संघटनेच्या पदाधिकारी व सकल हिंदू समाजाच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS