Homeताज्या बातम्यादेश

गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ दर्जा द्या; केंद्रीय गोसेवा मंत्रालयाची मागणीमाहूरमधील गोभक्तांचे राष्ट्रपतींना निवेदन

भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या भारतीय गोवंशाला घटनात्मक संरक्षण मिळावे, या मागणीसाठी माहूर येथील गो

महापालिका सत्ताकेंद्रात विसंवादाची खदखद; महापौर-उपमहापौर संघर्षाच्या चर्चांना वेग
विष्णुपुरीत मुबलक जलसाठा; नांदेडवरील पाणीटंचाईचे संकट टळले
चार दिवसांची चांदणी… पुन्हा शहरात अंधारच अंधार!श्रेयवादात नेते व्यस्त; 43 अंश तापमानात नागरिकांचा जीव मेटाकुटीला



भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या भारतीय गोवंशाला घटनात्मक संरक्षण मिळावे, या मागणीसाठी माहूर येथील गोभक्त, संत समाज आणि नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. ‘गो सन्मान आह्वान अभियान’ अंतर्गत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्र आराध्या’ असा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रपतींच्या अलीकडील वृंदावन दौर्‍यातील ‘गोपूजन’ आणि गोवंशाला ‘जीवनधन’ असे संबोधन यामुळे गोभक्तांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या रस्त्यावर भटकणारा गोवंश, तसेच वाढती तस्करी ही गंभीर समस्या बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी राज्यनिहाय कायद्यांऐवजी संपूर्ण देशभर लागू होईल असा एकसंध केंद्रीय कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, गोसंवर्धनासाठी स्वतंत्र ‘केंद्रीय गोसेवा मंत्रालय’ स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालयामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या मागण्यांमुळे गोसंवर्धनाच्या विषयाला राष्ट्रीय स्तरावर चालना मिळून भारतीय गोवंशाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS