Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

५ वर्षांखालील मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता ७ पट अधिक-डॉ. अभिराज पवार

नाशिक :-  सामान्यपणे फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझा चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ह्या विषाणूंचा प्रसार वर्षभर होतच असतो पण पावसाळ्यात आ

बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे कधी करु शकत नाहीत :रामदास आठवले
शिष्यवृत्ती परीक्षेत काळे विद्यालयाचे यश
रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी नऊ चालकांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक :-  सामान्यपणे फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझा चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ह्या विषाणूंचा प्रसार वर्षभर होतच असतो पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तापमानातील चढउतारांमुळे त्याचा प्रसार अधिक वेगाने होतो. लहान मुलांना ह्यातील कोणत्याही विषाणूमुळे फ्लूची लागण होऊ शकते आणि मग संपूर्ण घराला फ्लूची लागण होते. फ्लूच्या विषाणूचा संसर्ग नाकात, घशात आणि काही वेळा फुप्फुसांमध्येही होतो. ५ वर्षांखालील मुले व ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णालयात दाखल करावे लागण्याच्या तसेच त्यांचा मृत्यू होण्याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे. फ्लूमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींमध्ये जीवाणूजन्य न्युमोनिया, कानाचा तसेच सायनसचा प्रादुर्भाव आणि पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अवस्था आणखी बळावणे आदींचा समावेश होतो.[1]लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्ण विकसित न झाल्यामुळे तसेच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असल्यामुळे त्यांना ह्या गुंतागुंतींचा सामना कणे कठीण होते. फोर-इन-वन (४-इन-१) फ्लू लस हा फ्लूच्या सर्व चार विषाणूंपासून होणाऱ्या प्रादुर्भावाचा धोका किमान स्तरावर ठेवण्याच्या सर्वांत प्रभावी मार्गांपैकी एक आहे. ६ महिने ते ५ वर्षे ह्या वयोगटातील लहान मुले आणि ५० वर्षांवरील वयाच्या व्यक्ती ह्यांना, गुंतागुंती टाळण्यासाठी दरवर्षी फ्लूची लस दिली जावी, अशी शिफारस इंडियन अकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक्स (आयएपी) आणि जागतिक आरोग्य संघटना करतात.नाशिक येथील उषाकिरण बाल रुग्णालयाचे डॉ. अभिराज पवार म्हणाले, “दरवर्षी  पावसाळ्याच्या ऋतूमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळते. सर्दी, श्वसनमार्ग अरुंद होणे आणि ताप ही फ्लूची लक्षणे आहेत. काही रुग्णांना, विशेषत: ५ वर्षांखालील मुलांना, फ्लूमुळे श्वसनास त्रास होतो आणि रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता निर्माण होते. वैयक्तिक स्वच्छता उत्तम राखणे आणि मास्क वापरणे  ह्यांसारखे प्रतिबंधात्मक उपाय करूनही मुलांना फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच ५ वर्षांखालील लहान मुलांसाठी फ्लूची लस महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांचे फ्लूपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने, वार्षिक फोर-इन-वन लशीबाबत तसेच सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) व वैयक्तिक स्वच्छता  राखण्याबाबत, वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांना भेटावे.

COMMENTS