Homeताज्या बातम्यादेश

ढाणे मंगल कार्यालय, येळंबघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार

मौजे येळंबघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी
आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावामतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या केल्या संबंधितांना सुचना



मौजे येळंबघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यावरण व हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेकनूर मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राणा डोईफोडे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. विशेषतः डखठ संकल्पनेद्वारे ग्रामीण युवक-युवतींना स्वावलंबनाच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लघुउद्योग, स्वयंरोजगार, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण तसेच ग्रामीण भागातील उत्पन्नवाढीच्या संधी यावर सखोल चर्चा झाली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) यांसह पशुसंवर्धन व शेतीपूरक व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी, महिला बचत गट आणि बेरोजगार युवकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांचीही सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, जि. प. सदस्य भारत काळे, शांताराम डोरले, शरद इंगळे, शांतीनाथ डोरले, भाजपाचे युवा नेते सुनील मिसाळ, बालाघाट मंडळ अध्यक्ष अशोक रसाळ, जिल्हा संयोजक अमोल वडतीले, तालुका सरचिटणीस महादेव नागरगोजे, सौ. भाग्यश्री ढाकणे, ब्रह्मनाथ डोईफोडे, सरपंच सोमनाथ तांदळे, उपसरपंच चंद्रशेखर कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि योजनांविषयीची उत्सुकता. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजना थेट समजावून सांगून त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला. या यशस्वी उपक्रमाचे श्रेय राणा डोईफोडे यांच्या प्रभावी नियोजनाला व पुढाकाराला जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे येळंबघाट परिसरातील नागरिकांना शासनाच्या योजनांची प्रत्यक्ष माहिती मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेकनूर मंडळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS