Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावरील लालिंग घाटात मृत्यूचे तांडव; ३ वाहनांच्या विचित्र अपघातात ६ ठार, २५ जखमी

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक-धुळे दरम्यान असलेल्या लालिंग घाट परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक महाभीषण अपघात झाला आहे. वाळूचा डंपर

तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार
मध्यप्रदेशातील अपघातात 5 युवकांचा मृत्यू
गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी
Dhule Accident News: मुंबई-आग्रा हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; लळींग  घाटात 3 वाहने एकमेकांना धडकली, 6 जणांचा मृत्यू। dhule laling ghat accident mumbai  agra ...

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक-धुळे दरम्यान असलेल्या लालिंग घाट परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक महाभीषण अपघात झाला आहे. वाळूचा डंपर, ट्रक आणि खाजगी बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका टोल नाक्यावरील अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला वाळूने भरलेल्या एका भरधाव डंपरने रस्त्यावरील ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर महामार्गावर स्थानिक लोकांकडून व प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात येत होते. मात्र, त्याच वेळी मागून आलेल्या एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने या आधीच अपघातग्रस्त असलेल्या वाहनांना आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांना जोरात धडक दिली.

बचावकार्य सुरू असतानाच मागून बस आदळल्याने घटनास्थळी एकच किंचाळत आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. या भीषण धडकेमुळे ६ जणांनी जागीच प्राण गमावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. लालिंग घाटात झालेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS