Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी

श्रीगोंदा : जि.प.प्रा.शाळा, खेतमाळीस मळा येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. लक्ष्यवेध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये शाळेतील समर व सक्षम या दोन्ही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तसेच सावता नगर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली बुद्धिमत्ता व अभ्यासू वृत्ती सिद्ध केली. ग्रामीण भागातील शाळेतून स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक वेठेकर व चोभे  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन केले. लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेतील हे यश जि.प.प्रा.शाळा खेतमाळीस मळा तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील

श्रीगोंदा : जि.प.प्रा.शाळा, खेतमाळीस मळा येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. लक्ष्यवेध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये शाळेतील समर व सक्षम या दोन्ही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तसेच सावता नगर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली बुद्धिमत्ता व अभ्यासू वृत्ती सिद्ध केली. ग्रामीण भागातील शाळेतून स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक वेठेकर व चोभे  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन केले.

लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेतील हे यश जि.प.प्रा.शाळा खेतमाळीस मळा तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

COMMENTS