Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री प्रकाश अहिरे यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार संपन्न

नगर रोड : कास्ट्राइब जनरल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच केंद्र शाळा पाली येथील केंद्रप्रमुख श्री. प्रकाशजी अहिरे हे नियत वयोमानानुसार दि

अरुण मुंढेंनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात चर्चा
पार्थ समर कॅम्पमुळे बालकांना नवी दिशा : डॉ. संदीप पवार
संजीवनीची अंजली साळुंके ९३ टक्क्यांसह प्रथम; कॉमर्स व सायन्स शाखेचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नगर रोड : कास्ट्राइब जनरल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच केंद्र शाळा पाली येथील केंद्रप्रमुख श्री. प्रकाशजी अहिरे हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने कास्ट्राइब जनरल कर्मचारी संघटनेतर्फे शासकीय विश्रामगृह, नगर रोड येथे त्यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. अनिल जाधवर हे होते. यावेळी श्री. प्रकाश अहिरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विविध उपक्रम राबवले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाकडूनही त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच उपशिक्षण अधिकारी पदावर निवड झालेले श्री. भगवानराव सोनवणे तसेच श्री. जमीर शेख उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दलही संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. सुभाष जगताप (राज्य महासचिव), श्री. पद्मनाथ गर्जे (विभागीय उपाध्यक्ष, संभाजीनगर विभाग), श्री. मच्छिंद्रनाथ जगताप (आष्टी तालुका अध्यक्ष), श्री. मल्हारी शिंदे (संघटक) यांच्यासह श्री. भाऊसाहेब हंगे, द. ल. वारे, सूर्यकांत शिंदे, विष्णू मिसाळ, राजू दहिफळे, सानप सर, सुनील वारे, मच्छिंद्रनाथ राख, अजय पतंगे, बाळकृष्ण अहिरे, प्रवीण सानप, माजी विस्तार अधिकारी रामचंद्र सुळे, बाळासाहेब शिरसाट, अर्जुन बारगजे, रवींद्र सुतार, अर्जुन आघाव, सोमनाथ तांदळे, संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व भावनिक झाले होते. उपस्थितांनी श्री. प्रकाश अहिरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS