Homeताज्या बातम्या

मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून काँगे्रसच ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा

ओबीसी आरक्षण लागू झाले, पण..!
कळसुबाईचे मंदिर सजले वारली चित्रकलेतील रंगकामाने
यदी आप किसी के हालात को समझते नहीं ; तो आपके सलाह उनके हालात बदलते नहीं!

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून काँगे्रसच ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे.

अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी आता विचार करायला हवा, अशी ऑफर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे पाटील म्हणाले, ज्या पक्षात अशोक चव्हाण आहेत. त्या काँग्रेस पक्षाचे भविष्य काय आहे?. नाशिक पदवीधरमध्ये व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली. यामध्ये पक्षाचा कुठे विचार झाला. अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केले आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण यांची मोठी परंपरा आहे. विश्‍वनेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने स्विकारले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याचा विचार अशोक चव्हाण यांनी करावा, असे विखे पाटील म्हणाले. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर दिले होते. सत्तेत येण्यापूर्वी भाजपचा प्लान ए म्हणजे अजित पवार, प्लान बी एकनाथ शिंदे होता. त्यानंतर आता प्लान सी अशोक चव्हाण आहे का? असा प्रश्‍न फडणवीसांना विचारण्यात आला होता. राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण स्वतः 2024 मध्ये अनेक सरप्राइजेस देऊ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, नेमके शिंदे-फडणवीस अजून काय सरप्राईज देणार असून, नेमके कोणत्या पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS