Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव

कोपरगाव शहर :  लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान” या उक्तीप्रमाणे शिंगणापूर-नऊचारी येथील श्री राधाकृष्ण मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य

आई-वडिलांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य-शांतीब्रह्म नवनाथ बाबा; ब्रम्हनाथ वस्ती येथे हरिकीर्तन उत्साहात संपन्न
रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
भव्य शोभायात्रेने संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सुरुवात; निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! जयघोषाने परिसर दुमदुमला

कोपरगाव शहर :  लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान” या उक्तीप्रमाणे शिंगणापूर-नऊचारी येथील श्री राधाकृष्ण मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगतगुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु जनार्दन स्वामी, परमपूज्य नारायणगिरीजी महाराज तसेच ह.भ.प. सोपान काका करंजीकर व ह.भ.प. यशवंत महाराज मुटेकर यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव होत असल्याची माहिती आयोजक भागवताचार्य संगीता महाराज चव्हाण यांनी दिली.
 महोत्सवाचा ध्वजारोहण सोहळा श्री राघवेश्वर आश्रमाचे मठाधिपती प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवार (दि. २१ एप्रिल) पासून सुरू होणाऱ्या या महोत्सव काळात दररोज पहाटे काकडा आरती, हरिपाठ, भजन, ज्ञानेश्वरी पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यभरातून आलेल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर  होळकर (ठाणे), ह.भ.प. एकनाथ सदगीर (ठाणे), ह.भ.प. प्रभाकर झोलकर (परभणी), ह.भ.प. ज्ञानेश्वरी कुऱ्हाडे  (देवाची आळंदी), ह.भ.प. माधवबाबा घुले (इगतपुरी), ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ (संत पंढरी) तसेच ह.भ.प. संजय धोंडगे (चांदवड) यांचा समावेश आहे.
 महोत्सवादरम्यान उपस्थित भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून मंगळवार (दि. २८ एप्रिल) रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या प्रसंगी विविध साधू-महंत व नामवंत भागवताचार्य उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजिका ह.भ.प. संगीता   चव्हाण, अतुल शांताराम संवत्सरकर यांनी केले आहे.  

COMMENTS