लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…

अहमदनगर/प्रतिनिधी : हद्दपार केले असतानाही लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत असलेल्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद क

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः आ. थोरात
गटविकास अधिकार्‍यामुळे आरओ प्लॉन्ट सुरू
पुस्तके माणसाला ज्ञानी बनवतात ः हेमचंद्र भवर

अहमदनगर/प्रतिनिधी : हद्दपार केले असतानाही लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत असलेल्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पथकाद्वारे शहरातील हद्दपार गुन्हेगारांची माहिती घेत असताना गोपनीय माहितीवरुन दिनेश रावसाहेब दातरंंगे व अतुल रावसाहेब दातरंगे (दोघे रा. तांगे गल्ली, नालेगाव), स्वप्नील अशोक ढवण (रा. ढवण वस्ती, तपोवन रोड), सोनू उर्फ स्वप्नील राजेन्द्र दातरंगे (रा.दातरंगे मळा, नगर) व अशिष रघुवीर गायकवाड (रा. शांतीपूर, तारकपूर, नगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिनेश दातरंगे,अतुल दातरंगे यांना ऑगस्ट 2021 पासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. तर स्वप्नील ढवण यास 15 जानेवारी 2020 पासून एक वर्षांचे कालावधीकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच सोनू उर्फ स्वप्नील दातरंगे यास 10 मार्च 21 पासून एक वर्षाचे कालावधीकरीता तर, अशिष गायकवाड यास 15 जानेवारी 2021 पासून एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. पण हे सर्वजण हद्दपारी आदेशाचा भंग करुन बेकायदेशीररित्या नगर शहरामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कारवाई कोतवाली व तोफखाना पोलिस करीत आहेत.
जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांना चेक करुन तडीपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आदेश दिले होते. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे स्वतंत्र पथक नेमून हद्दपार गुन्हेदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

COMMENTS