Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे सीना प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवातआष्टीतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा, ग्रामस्थांकडून आभार

आष्टी :आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या

ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले
लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी

आष्टी :आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आ. सुरेश धस यांनी कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 2, श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे मागणी करत आष्टी तालुक्यातील सीना प्रकल्प लाभक्षेत्रातील पिंपरी (घुमरी), कानडी बुद्रुक आणि वाकी या तीन बंधार्‍यांमध्ये पाणी साठवून शेती सिंचनासाठी तातडीने पाणी सोडण्याची विनंती केली होती. या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेत आवश्यक कार्यवाही पूर्ण केली. यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील पिकांना मोठा आधार मिळणार असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे आमची मोठी चिंता दूर झाली, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दरम्यान, आ सुरेश धस यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. तसेच प्रशासनाकडून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व नियोजनबद्ध ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

COMMENTS