Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड पोलिसांचा उत्कृष्ट तपास; खून प्रकरणात पाच आरोपींना जन्मठेप

बीड : मा. सत्र न्यायालय, बीड (न्यायाधीश मा. श्री. आनंद एल. यावळकर) यांनी सेशन केस क्र. 131/2016 मधील महत्त्वपूर्ण निकालात पाच आरोपींना दोषी ठरवून

मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
’कॉर्पोरेट जिहाद’ची होणार चौकशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
Cry in front of the hotel because of the rumour; A police car was  lathicharged by a mob, a case was registered against seven people in Beed  police station, the incident was

बीड : मा. सत्र न्यायालय, बीड (न्यायाधीश मा. श्री. आनंद एल. यावळकर) यांनी सेशन केस क्र. 131/2016 मधील महत्त्वपूर्ण निकालात पाच आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे बीड पोलिसांच्या सखोल, शास्त्रशुद्ध व प्रभावी तपासाला मोठे यश मिळाले आहे.
या प्रकरणात मृत महिला संगीता एकनाथ कुहाचडे हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळून विहिरीत टाकण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक पुरावे, घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे तसेच परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी काटेकोरपणे करून महत्त्वाचे पुरावे संकलित करत भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील अ‍ॅड. ए. एस. तांदळे यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयाने एकनाथ चंद्रभान कुहाचडे, चंद्रभान दासू कुहाचडे, फुलाबाई चंद्रभान कुहाचडे, शंकर बंडू कुहाचडे आणि शंतीबाई शंकर कुहाचडे या पाच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 302, 201 सह 34 अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यादरम्यान पोलीस अधीक्षक बीड श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली र्कलाांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पैरवी अधिकारी, दोषसिद्धी कक्ष व इतर कर्मचार्‍यांनी सातत्याने परिश्रम घेत प्रभावी पैरवी केली. हा निकाल बीड पोलिसांच्या व्यावसायिक, शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक तपास कार्याची साक्ष देणारा असून गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे

COMMENTS