Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी;नगरसेविका दीपाली बंग यांचे निवेदन; सत्याग्रहाचा इशारा

पाथर्डी : शहरातील मनोज मुथा दुकान ते खालचा गणपती (कोटकर घर) दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दीपाली रामनाथ बंग व रामनाथ बंग यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, मागणी मान्य न झाल्यास ३० एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशाराही दिला आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तरीय) अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात गांधी चौक ते कोटकर घर (खालचा गणपती) या भागातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी १८ एप्रिल २०२३ रोजी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या कामाचे स्वरूप बदलून गांधी मेडिकल (क्रांती चौक) ते गांधी चौक मुथा दुकानेपर्यंतच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.  त्यामुळे उर्वरित मुथा दुकान ते खालचा गणपती हा रस्ता अद्याप अपूर्णच राहिला असून तो तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या ११ मे २०२६ रोजी जैन धर्मीयांचा दीक्षा समारंभाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याने त्यापूर्वी या रस्त्याचे इस्टिमेट, निविदा व कार्यारंभ आदेश काढून काम पूर्ण करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.  अन्यथा ३० एप्रिल २०२६ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पती-पत्नी बैठा सत्याग्रह करतील, असा इशारा देत याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 

बालेपीर परिसरातील मूलभूत समस्यांची पाहणी; तातडीने उपाययोजनांचे आश्वासन
संजीवनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ‘अद्विक हाय-टेक’मध्ये नोकरी
संजीवनी इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांंना नोकरी

पाथर्डी : शहरातील मनोज मुथा दुकान ते खालचा गणपती (कोटकर घर) दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दीपाली रामनाथ बंग व रामनाथ बंग यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, मागणी मान्य न झाल्यास ३० एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशाराही दिला आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तरीय) अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात गांधी चौक ते कोटकर घर (खालचा गणपती) या भागातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी १८ एप्रिल २०२३ रोजी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या कामाचे स्वरूप बदलून गांधी मेडिकल (क्रांती चौक) ते गांधी चौक मुथा दुकानेपर्यंतच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

 त्यामुळे उर्वरित मुथा दुकान ते खालचा गणपती हा रस्ता अद्याप अपूर्णच राहिला असून तो तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या ११ मे २०२६ रोजी जैन धर्मीयांचा दीक्षा समारंभाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याने त्यापूर्वी या रस्त्याचे इस्टिमेट, निविदा व कार्यारंभ आदेश काढून काम पूर्ण करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

 अन्यथा ३० एप्रिल २०२६ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पती-पत्नी बैठा सत्याग्रह करतील, असा इशारा देत याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 

COMMENTS