एटीएम मशीन चोरणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या पारनेर पोलीसांनी आवळल्या मुस्क्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एटीएम मशीन चोरणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या पारनेर पोलीसांनी आवळल्या मुस्क्या

अहमदनगर / पारनेर : दिनांक १५/१२/२०२१ रोजी रात्री ००.३० ते ०१.०० वा.चे दरम्यान शिरुर रोडलगत जवळा ता . पारनेर जि . अहमदनगर येथील इंडिया वन लि . या कंपन

ऐसाम शिलेदारची बास्केटबॉल तपश्‍चर्या कौतुकास्पद – पो.नि. डोईफोडे
जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप
‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात कोपरगावकर झाले लोटपोट

अहमदनगर / पारनेर : दिनांक १५/१२/२०२१ रोजी रात्री ००.३० ते ०१.०० वा.चे दरम्यान शिरुर रोडलगत जवळा ता . पारनेर जि . अहमदनगर येथील इंडिया वन लि . या कंपनीचे ए . टी . एम मशिन हे बोलेरो जिपच्या साहाय्याने वायररोप लावुन ओढुन घेवनु जावून त्यातील ३,२८ , ७०० / – रुपये रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली वगैरे हकिगती प्रमाणे तक्रारदार आरिफ मंगतुददीन खिलजी वय ४७ वर्ष धंदा वितरक रा . गजानन कॉलनी नवनागापुर अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं। ९ १८ / २०२१ भा.द.वि कलम ३७ ९ , ४२७ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . सदर गुन्हयाचे तपासात असतांना पोलीस निरीक्षक श्री घनशाम बळप सो यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पारनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करुन गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्हयातील आरोपी ऋतीक शिवाजी बेंद्रे रा . पिंपळनेर ता . पारनेर जि . अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्याने प्रथम माहीती देण्यास टाळाटाळ केली परंतु त्यास अधिक विश्वासात घेता त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हा हा त्याचे इतर ७ साथीदारांसोबत केल्याची माहीती दिल्याने त्याचे साथीदारांचा शोध घेता आरोपीचे इतर ५ साथीदार मिळुन आल्याने त्यांना देखील गुन्हयाचे कामी ताब्यात घेवून त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली . सदर गुन्हयाचे तपासकामी अदयाप पावेतो १. ऋतक शिवाजी बेंद्रे वय २० वर्ष , २. उमेश हरिभाऊ सातपुते वय २२ वर्ष ३.तुषार रखमाजी पवार वय २१ वर्ष ४ दिनेश हरिभाऊ सातपुते २४ वर्ष सर्व रा.पिंपळनेर ता . पारनेर जि . अहमदनगर ५. आकाश उर्फ बुंग्या सुभाष पाचुंदकर वय २४ वर्ष , ६. सुर्यकांत उर्फ काळया शंकर धुमाळ वय २५ वर्ष रा . रांजणगाव ता . शिरुर जि . पुणे , यांना अटक करण्यात आली आहे . त्यांची मा.न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे . गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री आर.डी.काळे हे करत आहेत . तपासा दरम्यान आरोपीतांकडुन बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदर आरोपी हे सराईत असुन त्यांचेवर एकुण २२ गुन्हे वेग वेगळया पोलीस स्टेशनला सोबत सादर केलेल्या यादीप्रमाणे दाखल आहेत . , सदरची उल्लेखनीय कामगिरी मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो , मा . अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल सो , उप विभागीय पोलीस अधिकारी न.ग्रा . वि . अ.नगर श्री अजित पाटील सो , पोलीस निरीक्षक श्री घनशाम बळप नेम पारनेर पो.स्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सपोनि / आर.डी. काळे , पोसई उगले , पोलीस अंमलदार पोहेकॉ / जालिंदर लोंढे , पोना / सुधीर खाडे , भालचंद्र दिवटे , यादव , डमाळे , मपोना / मनिषा चव्हाण , पोलीस अंमलदार सत्यम शिंदे , सागर तोरडमल , सुरज कदम यांचे पथकाने केली . कारवाई दरम्यान अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पथकाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे

COMMENTS