Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

शहरातील ओपन स्पेस व गायरान जमिनींचे तात्काळ नियोजन करानगरसेवक मंगेश धोंगडे यांची आक्रमक मागणी

शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भाजपचे नगरसेवक मंगेश धोंगडे यांनी बीड नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे विविध

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
मुदखेडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आमदार श्रीजया चव्हाण
श्रीगोंद्यात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाटपर्यावरण धोक्यात, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप



शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भाजपचे नगरसेवक मंगेश धोंगडे यांनी बीड नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे विविध महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नियोजन व विकास समितीकडे निवेदन सादर केले.
या निवेदनात शहरातील ओपन स्पेसचे व्यवस्थापन, त्या जागांभोवती कंपाउंड उभारणी तसेच गायरान जमिनींचे नियोजन यावर विशेष भर देण्यात आला आहे. धोंगडे यांनी नमूद केले की, प्रत्येक वॉर्डमधील मोकळ्या जागांची स्वतंत्र नोंद ठेवून त्याची माहिती संबंधित नगरसेवकांना देणे आवश्यक आहे. तसेच या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात. याशिवाय, नागरिकांच्या हितासाठी या ओपन स्पेसचा नियोजनबद्ध वापर व्हावा, यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक मोकळ्या जागेभोवती कंपाउंड उभारल्यास त्या जागांचे संरक्षण होऊन अतिक्रमणाला आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. गायरान जमिनींच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाची मागणी करताना सांगितले की, घरकुलासाठी भूखंड वाटप करताना प्रक्रिया सुलभ व पारदर्शक असावी. नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सहकार्य करणे आवश्यक आहे. या तिन्ही मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील नियोजन, पारदर्शकता आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS