Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांंना नोकरी

कोपरगाव : येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट विभागाच्या विश्वासार्हतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, एकाचवेळी १२ विद्यार्थ्यांची स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. अंतिम निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेला अधोरेखित झाले आहे. महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सातत्याने विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क ठेवत असून, त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना घडविण्यावर भर दिला जातो. तसेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत असल्याचे या निवडीवरून स्पष्ट झाले आहे. स्कॅटरपाय अनॅलिटीक्स प्रा. लि. या डेटा अनॅलिटीक्स क्षेत्रातील कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील पायल बाबासाहेब बोर्डे, खुशी मिलिंद गुरवे, अथर्व महेश काळे, प्रसाद बबन परजणे, कृष्णा रामदास शेलार, सिद्धांत विजय ठोंबरे, श्रुष्टी नितीन वाघमारे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील पूजा विकास खळेकर, सुशांत उदय नाईक, ऋतुजा योगेश ठोंबरे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील यशोदीप शरदकुमार फसळे व प्रथमेश सुरेश जाधव यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तर कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उद्योगाभिमुख शिक्षणावर भर : अमित कोल्हे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उद्योगाभिमुख व कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, औद्योगिक भेटी तसेच सॉफ्ट स्किल्स व तांत्रिक प्रशिक्षणामुळे विद्यार्थी उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षम बनतात. त्यामुळे विविध नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत ते यशस्वी ठरतात, असे प्रतिपादन कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी केले. 

‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 
संजीवनी इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांना नोकरी 
बातमीत इंग्रजी शब्द आहेत; संजीवनी इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांना नोकरी 

कोपरगाव : येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट विभागाच्या विश्वासार्हतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, एकाचवेळी १२ विद्यार्थ्यांची स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. अंतिम निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेला अधोरेखित झाले आहे.

महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सातत्याने विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क ठेवत असून, त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना घडविण्यावर भर दिला जातो. तसेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत असल्याचे या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.

स्कॅटरपाय अनॅलिटीक्स प्रा. लि. या डेटा अनॅलिटीक्स क्षेत्रातील कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील पायल बाबासाहेब बोर्डे, खुशी मिलिंद गुरवे, अथर्व महेश काळे, प्रसाद बबन परजणे, कृष्णा रामदास शेलार, सिद्धांत विजय ठोंबरे, श्रुष्टी नितीन वाघमारे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील पूजा विकास खळेकर, सुशांत उदय नाईक, ऋतुजा योगेश ठोंबरे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील यशोदीप शरदकुमार फसळे व प्रथमेश सुरेश जाधव यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तर कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

उद्योगाभिमुख शिक्षणावर भर : अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उद्योगाभिमुख व कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, औद्योगिक भेटी तसेच सॉफ्ट स्किल्स व तांत्रिक प्रशिक्षणामुळे विद्यार्थी उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षम बनतात. त्यामुळे विविध नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत ते यशस्वी ठरतात, असे प्रतिपादन कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी केले. 

COMMENTS