Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभारी सबस्टेशनची क्षमता दुप्पट; कुंभारीसह हिंगणी, माहेगाव देशमुखची वीज समस्या संपुष्टात

कोपरगाव : मतदारसंघातील वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कुंभारी सबस्टेशनची क्षमता ५ एमव्हीएवरून १० एमव्हीएपर्यंत वाढविण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील कृषी, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच हे सबस्टेशन नव्या क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले. कुंभारी, हिंगणी, माहेगाव देशमुख, सोनारी व धारणगाव या गावांना वीजपुरवठा करणारे कुंभारी सबस्टेशन पूर्वी क्षमतेअभावी अपुरे ठरत होते. ग्राहकसंख्या वाढल्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे शेतीपंप जळण्याचे प्रकार वाढले होते. दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यातही अडचणी येत होत्या. या समस्यांची दखल घेत आ. काळे यांनी उर्जा विभागाकडे पाठपुरावा करून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. या निधीतून सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात आली असून आता ते १० एमव्हीए क्षमतेने कार्यरत झाले आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये कृषीपंपांसाठी टप्प्याटप्प्याने दिला जाणारा वीजपुरवठा आता एकाचवेळी व दिवसा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांच्या भीतीने पाणी भरण्याची वेळ येणार नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना आ. काळे म्हणाले, की वाढत्या विजेच्या मागणीमुळे अनेक ठिकाणी सबस्टेशनची क्षमता अपुरी पडत होती. त्यामुळे मतदारसंघातील आवश्यक ठिकाणी सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी तसेच नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी उर्जा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळे लवकरच सर्व विजेच्या समस्या कायमच्या दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास महावितरणचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता रंजना करसाळे, सहाय्यक अभियंता योगेश सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कुंभारी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा; राष्ट्रवादीची मागणी; नगरसेवक अत्तार यांचा आंदोलनाचा इशारा
व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ.काळेंकडून अभिनंदन
संजीवनी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी : कोल्हे

कोपरगाव : मतदारसंघातील वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कुंभारी सबस्टेशनची क्षमता ५ एमव्हीएवरून १० एमव्हीएपर्यंत वाढविण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील कृषी, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच हे सबस्टेशन नव्या क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले.

कुंभारी, हिंगणी, माहेगाव देशमुख, सोनारी व धारणगाव या गावांना वीजपुरवठा करणारे कुंभारी सबस्टेशन पूर्वी क्षमतेअभावी अपुरे ठरत होते. ग्राहकसंख्या वाढल्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे शेतीपंप जळण्याचे प्रकार वाढले होते. दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यातही अडचणी येत होत्या.

या समस्यांची दखल घेत आ. काळे यांनी उर्जा विभागाकडे पाठपुरावा करून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. या निधीतून सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात आली असून आता ते १० एमव्हीए क्षमतेने कार्यरत झाले आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये कृषीपंपांसाठी टप्प्याटप्प्याने दिला जाणारा वीजपुरवठा आता एकाचवेळी व दिवसा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांच्या भीतीने पाणी भरण्याची वेळ येणार नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी बोलताना आ. काळे म्हणाले, की वाढत्या विजेच्या मागणीमुळे अनेक ठिकाणी सबस्टेशनची क्षमता अपुरी पडत होती. त्यामुळे मतदारसंघातील आवश्यक ठिकाणी सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी तसेच नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी उर्जा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळे लवकरच सर्व विजेच्या समस्या कायमच्या दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास महावितरणचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता रंजना करसाळे, सहाय्यक अभियंता योगेश सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कुंभारी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS