Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी : कोल्हे

कोपरगाव : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून सन २००४ मध्ये आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणू

स्वच्छतागृहांसाठी सव्वाकोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष संधान
टाकळी कडे येथे म. फुले यांची जयंती उत्साहात
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील लांडे खून प्रकरण

कोपरगाव : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून सन २००४ मध्ये आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने टाकळी येथे संजीवनी एकलव्य आदिवासी आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यश संपादन करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील सचिन साईनाथ पवार यानेही शिक्षणासोबत मिळालेल्या संस्कारांच्या बळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत मुंबई येथे तिकीट तपासनीस पदावर निवड मिळवून स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन संजीवनी समूह संस्थांचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी सचिन पवार याची भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत मुंबई येथे तिकीट तपासनीस पदावर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अशैक्षणिक विभागप्रमुख डी. एन. सांगळे, प्राथमिक विभागाचे प्राचार्य आण्णासाहेब टकले आदी उपस्थित होते.
सचिन पवार याने सन २०११ ते २०२१ या कालावधीत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण संजीवनी आश्रमशाळेत पूर्ण केले. येथे मिळालेल्या शैक्षणिक प्रेरणेतून त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले असून २६ मेपासून तो सेवेत रुजू होणार आहे.
सुमित कोल्हे म्हणाले, “स्व. शंकरराव कोल्हे यांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्याचा जो वारसा निर्माण केला, तो संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेला जात आहे. सचिन पवारसारखे अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबातील पहिली नोकरदार पिढी ठरत असून हीच स्व. शंकरराव कोल्हे यांना खरी आदरांजली आहे.”

COMMENTS