Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारी संस्थेचा कारभार काटकसरीसह चिकाटीने चालवा : राजेंद्र नागवडे

श्रीगोंदा : सहकारी संस्था अथवा पतसंस्थेचा कारभार करताना काटकसर, पारदर्शकता आणि चिकाटी या तत्त्वांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संस्थेच्या यशास

पोल्ट्रीला कृषी दर्जा न मिळाल्यास आंदोलन : बाळासाहेब देशमुख
भोंदूगिरीला पाठबळ देणाऱ्या ३९ आमदारांचे राजीनामे घ्या;माकपची मागणी; ६ एप्रिलला राज्यभर आंदोलनाचा इशारा
रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू 

श्रीगोंदा : सहकारी संस्था अथवा पतसंस्थेचा कारभार करताना काटकसर, पारदर्शकता आणि चिकाटी या तत्त्वांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संस्थेच्या यशासाठी सक्षम व कार्यक्षम संचालक मंडळ महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटी, शाखा श्रीगोंदा यांच्या वतीने सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नागवडे होते.

कार्यक्रमास माध्यमिक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, निरीक्षक सचिनराव लगड, अशोकराव कारले, आप्पासाहेब जगताप, रमजान हवलदार, शिरीष टेकाळे, विजय पठारे, बाजीराव अनुभुळे, छबुराव फुंदे, शिवाजी लवांडे, सुरज घाट, नंदकुमार शितोळे, बाळासो राजळे, सुरेश मिसाळ, सुनील दानवे, प्रशांत खामकर, नंदकुमार कुरुमकर, दिलीप तुपे, नानासाहेब सुद्रिक, विठ्ठल बुंगे, सुदाम दळवी, वैशाली दारकुंडे, वर्षा खिल्लारी, रामदास जंजिरे, विलास वाघमोडे, विलासराव शितोळे, श्रीकांत उबाळे, देवराव दरेकर, वैभव चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचे सांगितले. सध्या बँकेकडून १२ टक्के दराने कर्ज घेऊन सभासदांना ७ टक्के दराने कर्ज दिले जाते. बँकेने व्याजदर कमी केल्यास सभासदांना आणखी सवलत देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, संस्थेत सत्ता आल्यानंतर २५ कोटी रुपयांच्या ठेवी वाढवल्याचे सांगून भविष्यातही सभासदांच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

संजय गायकवाड यांनी संचालक आप्पासाहेब जगताप यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. रमजान हवलदार यांनी ठेवींवरील व्याजदर वाढवून सभासदांना अधिक लाभ देण्याचा सल्ला दिला.

यावेळी विविध मान्यवरांनी मौलिक सूचना करत सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब जगताप यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत रायकर व शिवाजीराव नागवडे यांनी केले, तर आभार आदिनाथ नागवडे यांनी मानले.

COMMENTS