पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे – छगन भुजबळ

Homeताज्या बातम्यानाशिक

पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे – छगन भुजबळ

नाशिक : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे, असे मत पालकमंत्

पुण्यात एमपीएससीच्या नव्या पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार ह्यांचे निधन

नाशिक : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज नाशिक येथील पुरिया पार्क सर्कल, दिंडोरी नाका पंचवटी या ठिकाणी उभारण्यात आलेले पहिले पक्षी पार्कचे उद्घाटनावेळी ते बोलत होते.

पंचवटीतील परशुराम पुरिया पार्कमध्ये ६५ फुटी पक्षी घर साकार झाले आहे. या पक्षी घराचा बेस जमिनीपासून दहा फुट असून ते एकूण १२ फुट उंच आहे.या अनोख्या संकल्पनेतून पक्षांच्या दाणापाण्याची सोय होणार असून रेडीमेड घरट्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. या पक्षी घरात पक्षांसाठी एकूण ८०० रेडीमेड घरटी असून सुमारे चार हजार पक्षी यात राहू शकणार आहे. सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या मदतीने या पक्षी घराची देखभाल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भुजबळ म्हणाले की, गुजरातमध्ये पक्षीघर ही संकल्पना राबवित असल्याने म्हैसने या तालुक्यात ठीकठिकाणी अशी पक्षीघरे पहायला मिळत आहे. त्याचधर्तीवर नगरसेवक गुरमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे हे पहिले पक्षी घर विकसित करण्यात आले आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात यावा. त्यातून पक्षांची संख्या वाढणार आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी देखील हा अनोखा उपक्रम ठरणार आहे. सिमेंटच्या जंगलात किमान पंचवटी परिसरात पक्ष्यांची किलबिलाट वाढणार आहे. नाशिक शहर व परिसरातील वातावरण अतिशय चांगले असल्याने नाशिक शहर व परिसरात असे प्रकल्प राबविण्यात यावेत. त्यातून पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळुन समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी देखील असे उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

COMMENTS