केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार

नागपूर प्रतिनिधी- विदर्भाच्या दृष्टीने अनेक मुद्दे सभागृहापुढे  ठेवण्याची गरज आहे. कापसाचे पडत चालले आहे, बांगलादेशाच्या आयात धोरणामुळे संत्र्याचे भ

रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
अ‍ॅमेझॉन देणार कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  
भाजपकडून बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याच काम : Rohit Pawar

नागपूर प्रतिनिधी- विदर्भाच्या दृष्टीने अनेक मुद्दे सभागृहापुढे  ठेवण्याची गरज आहे. कापसाचे पडत चालले आहे, बांगलादेशाच्या आयात धोरणामुळे संत्र्याचे भाव पडलेले आहेत तिथे लक्ष देणे गरजेचे आहे मराठवाडा विदर्भात अतिवृषटीमुळे रस्ते खराब झाले पण निधी मिळाला नाही. खूप मदत केल्याचा आव आणण्यात आला, मात्र तशी मदत गडचिरोली भागात कुठे झाली नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

विदर्भात उद्योग येण्या संदर्भातही कुठलाही विषयावर चर्चा झालेली नाही. विदर्भ मराठवाड्याची चर्चा अधिवेशनात होण्याची गरज होती मात्र त्यात कुठली मदत झालेली नाही. विधिमंडळात जेव्हा आम्ही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी बोलू दिले जात नसल्याचही आरोप रोहित पवार यांनी केला. अनेक महत्वाचा मुद्द्यावर सरकारच्या माध्यमातून उत्तर देणे अपेक्षित होतं, टी ईटी घोटाळा प्रकरणात जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा त्यावर उत्तर होत नसेल हे लोकशाही विरोधी काम सुरू आहे.

अनिल देशमुख यावर कारवाई करून गृहमंत्री याणा सुद्धा अटक करू शकतो हा संदेश द्यायचा होता,पणकोर्टाने दिलेल्या निकालामध्ये राजकीय हेतूनं मोघम आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याचं म्हटलं आहे. शिंदे गट कार्यालय वाद केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे, अनिल देशमुख यांचं स्वागत होत असताना माध्यमंच लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी शिंदे गटाने कार्यालय ताब्यात घेत ही बातमी निर्माण केली जात असल्याची सवय लागली आहे.

COMMENTS