काँग्रेस गळती कशी रोखणार ?

Homeताज्या बातम्याराजकारण

काँग्रेस गळती कशी रोखणार ?

गुजरात विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना, काँगे्रसचा गुजरातमधील पाटीदार समाजाचा चेहरा हार्दिक पटेल याने काँगे्रसला सोडचिठ्ठी देत

गदारोळात हरवले शेतकर्‍यांचे प्रश्‍न
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने…
अध्यादेशाचा उतारा

गुजरात विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना, काँगे्रसचा गुजरातमधील पाटीदार समाजाचा चेहरा हार्दिक पटेल याने काँगे्रसला सोडचिठ्ठी देत पक्षनेतृत्वावर अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यातील महत्वाचा प्रश्‍न म्हणजे, हार्दिक म्हणतो माझ्याकडे क्षमता असूनही पक्षाने माझ्यावर आतापर्यंत कोणतीही कामगिरी सोपवली नाही. यात बरेच तथ्य आहे. काँगे्रसकडे क्षमता असूनही त्याचा पुरेपूर वापर काँगे्रस करतांना दिसून येत नाही. काँगे्रस आपल्याच नेत्यांना कोणतीही कामगिरी न सोपवता, त्यांना एका कोपरर्‍यात बसवून ठेवतांना दिसून येत आहे. जनतेशी नाळ जोडलेले नेते काँगे्रसमधून बाहेर पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रसला आता जनाधार राहिला नाही. आणि तो मिळवण्याची त्यांची कोणतीही महत्वाकांक्षा दिसून येत नाही. आगामी लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी अवघा दीड वर्षांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत काँग्रेसला अनेक पातळयांवर बदल करावे लागतील. मात्र तो बदल करण्याची मानसिकता सध्या तरी काँगे्रसमध्ये दिसून येत नाही. काँगे्रसला एक वेगळे रुप देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँगे्रसमधील जी-23 नेत्यांनी काँगे्रसला जाहीर सल्ले दिले. मात्र तरी देखील काँगे्रस धोरणात्मक पातळीवर कोणतेही बदल करतांना दिसून येत नाही. परिणामी काँगे्रसचे फायर ब्रिगेड नेते पक्ष सोडून जातांना दिसून येत आहे. पटेल आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून समोर आलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसनेही त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र वर्षअखेरीस होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर हार्दिक यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ’गुजरातमध्ये पटेल समाजासह इतर सर्वज समाजांवर काँग्रेस अन्याय करत आहे. काँग्रेसमध्ये सत्य बोलल्यास मोठे नेते तुम्हाला बदनाम करतात. काँग्रेस महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलत नसून असंच सुरू राहिलं तर हा पक्ष पुढील 20 वर्षांतही सत्ता मिळवू शकत नाही,’ अशा शब्दांत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. राजस्थानातील उदयपूर येथे काँगे्रसचे नवचिंतन शिबीर झाले. या शिबिरात देखील काँगे्रसच्या भवितव्याचा विचार होईल, काही धोरणात्मक निर्णय होईल अशी शक्यता होती. मात्र या शिबिरात देखील कोणत्याही नेत्यांने नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले, ना, कोणताही सल्ला दिला. ज्या जी-23 नेत्यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेत काँगे्रसला घरचा आहेर दिला, त्या नेत्यांनी देखील या शिबिरात कोणतीही खंबीर भूमिका घेतली नाही. काँगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्याविरोधात बोलण्याची किंवा त्यांना आजचे राजकीय वास्तव नजरेसमोर आणून देण्याची कोणत्याही नेत्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे काँगे्रस खरंच गंभीर आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. जर नेतृत्वच गंभीर आणि खंबीर नसेल, तर इतर नेत्यांना सुस्ती येते. त्यामुळे नेतृत्व हे ऊर्जा भरणारे पाहिजे. मात्र तसे नेतृत्व काँगे्रसकडे सध्या तरी दिसून येत नाही. राहुल गांधी यांची धरसोड वृत्ती, राजकीय गांभीर्याचा अभाव, यामुळे ते राजकारणात फारसे यशस्वी होतांना दिसून येत नाही. प्रियंका गांधी उत्तरप्रदेशात निवडणूक प्रचारात उतरल्या, त्यांनी संपूर्ण उत्तरप्रदेश काँगे्रसची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, मात्र त्यांचा अनुभव तिथे कमी पडला. परिणामी उत्तरप्रदेशात देखील काँगे्रसला सपशेल पराभव पत्करावा लागला. काँगे्रस जोपर्यंत पक्षाला गंभीर, खंबीर आणि ऊर्जादायी नेतृत्व देणार नाही, तोपर्यंत काँगे्रसची गळती कुणीही थांबवू शकणार नाही. हार्दिक पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँगे्रस पुन्हा एकदा गुजरातमध्ये गलितगात्र झाला आहे.

COMMENTS