कोपरगाव शहर : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत असतानाही करंजी (ता. कोपरगाव) येथील पार्थ चंद्रकांत भिंगारे याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या जम्प रोप सिनियर नॅशनल व ६ व्या ऑल इंडिया जम्प रोप चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत पार्थने सहभाग घेतला होता. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या पार्थने ‘डबल डच स्पीड रिले ४३०’ या प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे पार्थने आपल्या गावासह तालुका व शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे मार्गदर्शक विवेक कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे यांनी त्याचे तसेच मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव शहर : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत असतानाही करंजी (ता. कोपरगाव) येथील पार्थ चंद्रकांत भिंगारे याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे.
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या जम्प रोप सिनियर नॅशनल व ६ व्या ऑल इंडिया जम्प रोप चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत पार्थने सहभाग घेतला होता. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या पार्थने ‘डबल डच स्पीड रिले ४३०’ या प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.
या यशामुळे पार्थने आपल्या गावासह तालुका व शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे मार्गदर्शक विवेक कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे यांनी त्याचे तसेच मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS