Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाच्या आवारात रयत क्रांतीचे बेमुदत ठिय्या आंदोलन

ओगलेवाडी : आंदोलनावेळी सचिन नलवडे, अजित बानुगडे, बापुराव पोळ, सुखदेव पवार व आंदोलक. कराड / प्रतिनिधी : गेल्या आठ वर्षांपासून टेंभू पाणी उपसा सिंचन

सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
तरडगाव येथे मातेकडून चिमुकल्याचा खून
सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या पीएची तडकाफडकी बदली

कराड / प्रतिनिधी : गेल्या आठ वर्षांपासून टेंभू पाणी उपसा सिंचन योजनेतून चार गावांना वर्षातून चार अवर्तने शेती पाण्यासाठी दिली जातात. पण यंदाच्या वर्षी एकच अवर्तन दिल्याने बोंबाळवाडी तलावातील पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे कराड तालुक्यासह कडेगांव तालुक्यातील शेतकर्‍यांची पीके होरपळवली आहेत. त्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन टेंभू पाणी उपसा सिंचन ओगलेवाडी येथील कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी सुरू केले आहे. दोन दिवसात कार्यवाही झाली नाही तर टेंभू योजनेत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील आदि उपस्थित होते. तसेच शामगाव, रायगाव, शाळगाव,बोंबाळेवाडी, करांडेवाडी या गावांच्या शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी बोंबाळवाडीच्या तलावात सोडले जाते. गेल्या आठ वर्षांपासून या तलाव्यातून रितसर परवाने काढून शेतकरी पीकांना पाणी देतात. वर्षातून पाण्याची चार अवर्तने सोडण्याचा नियम आहे. पण यंदाच्या वर्षात एकच अवर्तन तलाव्यात सोडण्यात आले. त्यामुळे पीके पाण्याविना जळू लागली आहेत. गेल्या महिन्यापासून वेळोवेळी कार्यालयातील अधिकारी टेंभूचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीआर यांना निवेदने दिली आहेत. तरी त्यावर पाणी सोडण्याची कार्यवाही झाली नाही. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेत येऊन शेतकर्‍यांची वस्तुस्थिती जाणून घेवून रेड्डीआर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. दोन दिवसात पाणी सोडतो म्हणून सांगितले तरी अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी 12 वाजता शेतकर्‍यांनी टेंभू कार्यालय येथे बेमुद ठिय्या आंदोलन सुरू केले. दोन दिवसात पाणी सोडण्याची कार्यवाही केली नाही तर टेंभू उपसा जलसिंचन योजनेत दोन दिवसात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
यामध्ये शामगावचे शेतकरी बाबुराव पोळ, युवराज पोळ, चंद्रकांत डांगे, पै. उत्तम पोळ, संतोष पोळ, राहुल यादव, बोबाळवाडीचे सरपंच सुखदेव पवार, माजी सरपंच विनायक पवार, रायगावचे राजेंद्र वाघ, सुरेश पोळ, शाळगावचे संभाजी मुळीक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कराड तालुक्यात टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा प्रकल्प असून कराड तालुक्यातील गावांसह कडेगाव तालुक्यातील गावांना नियमानुसार पाणी मिळत नाही. त्यासाठी जो पर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही होत नाही. तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहील. तसेच येत्या दोन दिवसात टेंभू उपसा जलसिंचन योजनेत शेतकरी जलसमाधी घेतील.

COMMENTS