Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने सादर केले एनएफओ

नाशिक :  टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) #ProtectYourFuture अंतर्गत एनएफओ लॉन्च केले आहेत.   सस्टेनेबल इक्विटी फंड   डायनाम

Satara : कुटुंब परगावी ,अपार्टमेंटमधील फ्लॅटला भीषण आग | LOKNews24
गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला
सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN

नाशिक :  टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) #ProtectYourFuture अंतर्गत एनएफओ लॉन्च केले आहेत. 

 सस्टेनेबल इक्विटी फंड 

 डायनामिक ऍडव्हान्टेज फंड 

एनएव्ही १० रुपये प्रति युनिट आहे.

टाटा एआयएचा सस्टेनेबल इक्विटी फंड शाश्वत किंवा पर्यावरण, सामाजिक व प्रशासन (ईएसजी) अनुकूल प्रथांचे पालन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घ कालावधीत भांडवल वृद्धी करू इच्छितो. या फंडमधील ८० ते १००% गुंतवणूक ईएसजी मानकांचे पालन करणाऱ्या इक्विटी व इक्विटीशी संबंधित इंस्ट्रुमेंट्समध्ये केली जाईल आणि २०% पर्यंत गुंतवणूक ही इतर इक्विटी किंवा डेट किंवा मनी मार्केट इंस्ट्रुमेंट्समध्ये केली जाईल. फंडच्या मूळ सिद्धांतांना दर्शवत टाटा एआयए प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक झाड लावेल, ज्याला जिओ-टॅग करता येईल आणि या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक पॉलिसीधारकाला त्याचे एक डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.

टाटा एआयएच्या डायनामिक ऍडव्हान्टेज फंडचा उद्देश बाजारपेठेतील अस्थिरतेसारखे घटक असताना देखील अधिक चांगले व स्थिर लाभ मिळवून देणे हा आहे. हा फंड बाजारातील परिस्थितीच्या आधारे इक्विटी व ऋण यांच्यात गुंतवणूक कॉर्पसचे वाटप करेल. 

या दोन्ही एनएफओमध्ये टाटा एआयएच्या युलिप, जसे की, फॉर्च्युन प्रो, वेल्थ प्रो, फॉर्च्युन मॅक्सिमा आणि वेल्थ मॅक्सिमा यांच्या मार्फत गुंतवणूक करता येऊ शकते. टाटा एआयएच्या अनोख्या गुंतवणूक लिंक्ड प्रोटेक्शन योजना परम रक्षक आणि संपूर्ण रक्षा सुप्रीम खरेदी करून देखील या संधीचा लाभ घेता येईल. अशा प्रकारे ग्राहक जीवन विमा संरक्षण घेऊन आपल्या प्रियजनांना सुरक्षित करून मार्केट लिंक्ड रिटर्नचे लाभ मिळवू शकतील.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) श्री. हर्षद पाटील यांनी सांगितले, “अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता यांच्या सध्याच्या काळात भविष्य सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला वातावरणातील बदलांचा देखील सामना करावा लागत आहे, वेगाने होत असलेले शहरीकरण आणि विकास यांचा पृथ्वीवर होत असलेला नकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही हे दोन एनएफओ सादर केले आहेत जे गुंतवणूकदारांना आपल्या पृथ्वीच्या उज्वल भवितव्यासाठी योगदान देण्यात व या सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम बनवतील.”

सस्टेनेबल इक्विटी फंडविषयी त्यांनी सांगितले, “आजच्या काळातील ग्राहक हरित पर्यावरण निर्मितीमध्ये योगदान देत आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करू इच्छितात. गुंतवणुकीसाठी असो किंवा उत्पादनांची निवड करताना असो, गुंतवणूकदार, मिलेनियल ग्राहक पर्यावरणाविषयी जबाबदारीचे पालन करणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. टाटा एआयएचा सस्टेनेबल इक्विटी फंड गुंतवणूकदारांना मनुष्यजातीसाठी एक चांगले भवितव्य घडवण्यात मदत करत असताना आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी शाश्वत गुंतवणुकीचे लाभ मिळवण्याची अनोखी संधी देत आहे. कृपया लक्षात ठेवा की या ट्रेंड्सना अनुसरून भारतात ईएसजी १०० इंडेक्सने ३ व ५ वर्षांच्या कालावधीत व्यापक निफ्टी ५० किंवा १०० इंडेक्सच्या तुलनेत अधिक चांगले रिटर्न दिले आहेत.”

सध्याच्या काळात व्यवसायांसाठी शाश्वत किंवा ईएसजी स्नेही नियमांचा स्वीकार करताना सस्टेनेबिलिटी हे महत्त्वाचे मानक बनले आहे. आर्थिक समावेशन यासारख्या विभागांव्यतिरिक्त, शाश्वत गुंतवणुकीमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इन्फॉर्मेशन इत्यादी आधुनिक फील्ड्सचा देखील समावेश आहे.  या आधुनिक विभागांमध्ये अनेक इन्फोटेक, फिनटेक आणि इतर कंपन्या वेगाने प्रगती करत आहेत, ज्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी सादर करतात. ग्राहकांची वाढती सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाविषयी चिंता यांचा प्रभाव त्यांच्या खरेदीच्या निर्णयांवर पडत आहे. नेल्सननुसार, ७५% मिलेनियल्स पर्यावरणाविषयी इतके जागरूक आहेत की त्यांनी आपल्या खरेदीच्या सवयी बदलून पर्यावरणस्नेही उत्पादने निवडणे पसंत केले आहे. ९०% मिलेनियल्सना पर्यावरणस्नेही गुंतवणुकीमध्ये रस आहे. म्हणूनच आर्थिक सुरक्षेबरोबरीनेच पर्यावरणासाठी योगदान देण्यात सक्षम बनवणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी खूप उपयुक्त ठरू शकतात.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात टाटा समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्लोबस्कॅन सस्टेनेबिलिटी लीडर्स सर्व्हेनुसार २०२२ मध्ये टाटा समूह सस्टेनेबिलिटीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. **

बाजारपेठेत सातत्याने लाभ मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, कोणतीही संपत्ती इतरांपेक्षा चांगली कामगिरी बजावणे कायम सुरु ठेवू शकत नाही. म्हणूनच गुंतवणुकीत वैविध्य असणे गरजेचे आहे. व्यवसाय चक्र छोटी होत आहेत आणि विविध घटनांचा प्रभाव बाजारपेठेवर पडत आहे, अशा काळात बाजारपेठेतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर फंड्सच्या वाटपाचे काम एखाद्या प्रोफेशनल फंड मॅनेजरकडे सोपवणे गरजेचे आहे. डायनामिक ऍसेट अलोकेशन फंड सर्व मार्केट सायकल्समध्ये सातत्यपूर्ण लाभ देण्यात मदत करू शकतो.

श्री हर्षद यांनी पुढे सांगितले, “बाजारपेठेत अस्थिरता असून देखील गुंतवणूकदारांना लाभ प्रदान करणे डायनामिक ऍडव्हान्टेज फंडचा उद्देश आहे. इक्विटी आणि ऋण यांच्यात संमिश्र गुंतवणूक करून हा उद्देश पूर्ण केला जाईल. अशा प्रकारे गुंतवणूकदार इक्विटीची वृद्धी क्षमता आणि डेट फंडमधील गुंतवणुकीच्या सुरक्षेचे लाभ मिळवू शकतील. मार्केटवर बारीक लक्ष ठेवणे आणि आपल्या पोर्टफोलिओला स्वतःहून वारंवार बॅलन्स करत राहण्याची गरज नाही, मार्केटमधील वेगवान उतारचढाव पाहता हे करत राहणे जवळपास अशक्य आहे.”

टाटा एआयएची संशोधन प्रक्रिया व कार्यप्रणाली चांगल्या प्रकारे परिभाषित आहे. संशोधनाच्या आधारे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून ही कंपनी पुढे जाते. शाश्वत उत्पन्न वृद्धी करत असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून बॉटम-अप स्टॉक निवडून पोर्टफोलिओ निर्माण करण्याच्या  सक्षम गुंतवणूक सिद्धांताचे पालन करते. याशिवाय गुंतवणूक टीम स्थिर आहे आणि बऱ्याच काळापासून कंपनीसोबत काम करत आहे. गुंतवणुकीची दीर्घकालीन उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आणि लाभाविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जोखीम-समायोजित गुंतवणूक लाभ निर्माण केले आहेत.

या तक्त्यामध्ये बेंचमार्क रिटर्न्सच्या तुलनेत टाटा एआयएच्या सध्याच्या फंड्सची कामगिरी दर्शवली गेली आहे.

COMMENTS