पुणे : पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसर्या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली.

पुणे : पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसर्या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत बी.ए. सेट परिधान करून धुराने भरलेल्या कार्यालयात प्रवेश केला.

COMMENTS