Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूरतसारखी गॅसटंचाई मुंबई-पुण्यात होऊ नये ?रोहिणी खडसे यांचा राज्य सरकारला इशारा

जळगाव : गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईने औद्योगिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम घडवून आणला असून, त्याचे पड

‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
अकोले तालुक्यात पेट्रोल पंप चालकांच्या अजब नियमामुळे खळबळ; शेतकऱ्यांना डिझेलसाठी आता ‘सातबारा’ द्यावा लागणार? अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल!

जळगाव : गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईने औद्योगिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम घडवून आणला असून, त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला इशारा देत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षाच्या परिणामस्वरूप इंधनपुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा फटका देशातील विविध भागांना बसत आहे. सूरतमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवत असून, अनेक लघु व मध्यम उद्योगांना कामकाज बंद ठेवण्याची वेळ आली आहे. उत्पादन ठप्प झाल्याने हजारो कामगारांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. स्वयंपाकाच्या गॅसअभावी लहान हॉटेल्स, खानावळी, रस्त्यावरचे खाद्यविक्रेते यांचे व्यवहार पूर्णपणे थांबले आहेत. या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांपुढे उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगारांनी आपापल्या गावी परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे.या स्थलांतराचे चित्र सूरतमधील उधना स्थानकावर प्रकर्षाने दिसून आले. उत्तर भारतातील राज्यांकडे जाणार्‍या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. तिकीट मिळवण्यासाठी झालेल्या झुंबडीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, आणि काही ठिकाणी किरकोळ चेंगराचेंगरीचीही भीती निर्माण झाली.
या सर्व घटनांचा संदर्भ देत रोहिणी खडसे यांनी सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सूरतमधील दृश्ये अत्यंत वेदनादायक असून, गॅस टंचाईमुळे कामगारांचे रोजगार आणि अन्न या दोन्ही गरजा धोक्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. अशा वेळी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे येथेही गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने खानावळी व हॉटेल व्यवसायावर परिणाम झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. रोजगारासाठी महानगरांकडे येणार्‍या तरुणांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी असेही म्हटले की, संकटाचे स्वरूप गंभीर असतानाही अपेक्षित तत्परता दिसून येत नाही. वेळेत नियोजन केले नाही, तर सूरतप्रमाणेच परिस्थिती मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये उद्भवू शकते. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि कामगारांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS