Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरीत सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

पुणे : राज्यात महिलांवरील आणि विशेषतः बालकांवरील अत्याचारांच्या घटना चिंताजनक पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकमधील ए

श्री विशालजी महारगुडे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार
हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!

पुणे : राज्यात महिलांवरील आणि विशेषतः बालकांवरील अत्याचारांच्या घटना चिंताजनक पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकमधील एका भोंदू व्यक्तीच्या प्रकरणाने राज्य हादरलेले असतानाच पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेली ही घटना समाजमन सुन्न करणारी ठरली आहे. मोशी येथील विनायकनगर परिसरात सात वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपीने मुलीला फूस लावून आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर मुलीने कुणालाही काही सांगितल्यास जीव घेण्याची धमकी देत तिला दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. भीतीमुळे चिमुकलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी म्हणजे तीन एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने पुन्हा त्याच प्रकाराचा प्रयत्न केला. यावेळी मुलीची आई आणि तिच्या नातेवाईकांनी खिडकीतून हा प्रकार पाहिला आणि तात्काळ हस्तक्षेप केल्याने ही गंभीर घटना उघडकीस आली. आईने धाडस दाखवत त्वरित भोसरी येथील औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्पर कारवाई करत रामु कुंजल निसाद (वय चाळीस) याला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई होईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS