Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

शेवगाव : शहरातील मिरी रोडवरील फलके कॉम्प्लेक्ससमोर शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्य

आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात
अयोध्येत भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
अपघातात कार चालक गंभीर जखमी

शेवगाव : शहरातील मिरी रोडवरील फलके कॉम्प्लेक्ससमोर शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास शेवगावहून नगरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकसमोर ही दुर्घटना घडली. इंदिरानगर येथे मित्राला सोडून रस्ता ओलांडत असताना दोन तरुणांचा तोल गेला आणि ते ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. अपघात इतका भीषण होता की एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. मृत तरुणांची नावे निखिल पठाडे (वय २५) आणि विनायक शिंदे (वय २६) अशी असून ते शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील रहिवासी असल्याचे समजते.

 घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन आणि रस्ता ओलांडताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.

COMMENTS