Homeताज्या बातम्याविदेश

इराणवर अमेरिका-इस्रायलचा भीषण हल्ला; आयतुल्ला खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू

नवी दिल्ली : इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या व्यापक हवाई हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आ

इराणमध्ये अडकले दोन हजार विद्यार्थी
इराणमध्ये आंदोलनांना हिंसक वळण; 217 जणांचा मृत्यू
इराणचे सौदीतील तेल प्रकल्पावर प्रतिहल्ले

नवी दिल्ली : इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या व्यापक हवाई हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नात यांचा मृत्यू झाला आहे. ‘फार्स’ या इराणी वृत्तसंस्थेसह इतर स्थानिक माध्यमांनी खामेनेई यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ‘शहादती’ची पुष्टी केली आहे. अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणमधील विविध लक्ष्यांवर केलेल्या नियोजित लष्करी कारवाईचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शोककळा पसरली असून पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.

COMMENTS