Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात थरारक विचित्र अपघातात ६ जणांचा मृत्यू; मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटातील घटना

धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटे एक भीषण विचित्र (तिहेरी) अपघात झाला. रेतीने भरलेला डंपर, एक कार आणि मध्य प्र

टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला जोरदार धडक; कोल्हापूरच्या दोघांचा मृत्यू
कंधार-मुखेड रोडवर भीषण अपघात; ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू
तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यूअंमळनेरजवळील घटना ; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
Dhule Accident News | धुळे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, ५ ठार

धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटे एक भीषण विचित्र (तिहेरी) अपघात झाला. रेतीने भरलेला डंपर, एक कार आणि मध्य प्रदेशातून येणारी प्रवासी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला असून, २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटातून जात असताना रेतीने भरलेल्या डंपरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डंपर विरुद्ध दिशेला गेला आणि समोरून येणाऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक दिली. हा पहिला अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू असतानाच, मागून वेगात आलेल्या एका प्रवासी बसने अपघातग्रस्त वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, अनेक प्रवासी वाहनांमध्येच अडकून पडले आणि काही जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वाहनांचे लोखंडी भाग कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

मदत करताना टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू; टोल वसुली बंद पाडली अपघातस्थळी मदतकार्य करत असताना टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी काही काळ टोल वसुली पूर्णपणे बंद पाडली होती. टोल प्रशासनाकडे सुरक्षा साधनांची कमतरता आहे आणि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण नाही, असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

COMMENTS