Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यापूर्वी शिवरस्ते, शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आ. पाचपुतेंसोबत सकारात्मक चर्चा

श्रीगोंदा : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवरस्ते, वहिवाट रस्ते आणि शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि लो

महाराष्ट्रात आता सरकारी जमिनीवर गवत लागवड! महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना
महसूल प्रकरणे निकाली काढण्यासाठी नवी ‘कार्यपद्धती’ लागू; निकालपत्रे मराठी भाषेतूनच बंधनकारक
जमिनीच्या मोजणीसह विविध सेवांसाठी नागरिकांना मिळणार दिलासा

श्रीगोंदा : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवरस्ते, वहिवाट रस्ते आणि शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी शक्य तितक्या रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती ‘शेतपानंद रस्ता चळवळी’चे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी दिली.

तालुक्यात “रस्ते आदर्श तालुका” ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी अनेक गावांमध्ये शिवरस्त्यांची मोजणी, सीमांकन आणि अतिक्रमणमुक्तीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने रस्ते खुले करणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि खुले झालेले रस्ते सातबारा व गाव नकाशावर नोंदविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार पाचपुते यांनी सांगितले की, मोजणी आणि सीमांकन पूर्ण करून प्रत्यक्ष खुले करण्यात आलेल्या रस्त्यांसाठी शासनाकडून प्रति किलोमीटर १२ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे २५ किलोमीटर रस्त्यांसाठी निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयात महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही श्रीगोंदा तालुक्यातील शेतरस्ते आणि शिवरस्त्यांच्या कामांचा विशेष आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न प्रत्यक्ष बांधावर जाऊन सोडवला जात असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

COMMENTS